‘रोटरी’तर्फे डॉ. डोईफोडे, खंडागळे यांचा सन्मान

‘रोटरी’तर्फे डॉ. डोईफोडे, खंडागळे यांचा सन्मान

पुणे, ता. ११ : सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना रोटरी क्लब ऑफ पुणे मिड ईस्टतर्फे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यंदा या पुरस्कारासाठी आयुर्वेद रसशाळेचे अध्यक्ष डॉ. विजय डोईफोडे आणि लायन डॉ. प्रसाद खंडागळे यांची निवड करण्यात आली. डॉ. डोईफोडे यांना व्होकेशनल एक्सलन्स, तर डॉ. खंडागळे यांना कोविड योद्धा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हे पुरस्कार रोटरी क्लब ऑफ पुणे मिड ईस्टचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भवाळकर व सचिव रोटेरियन अंबालाल ओसवाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी डॉ. आनंद केंच, सतीश भोपटकर, रमेश रहाळकर आणि नितीन ओसवाल उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com