Wed, October 4, 2023

स्व-रुपवर्धिनीचा उद्या स्नेहमेळावा
स्व-रुपवर्धिनीचा उद्या स्नेहमेळावा
Published on : 11 May 2023, 2:23 am
पुणे, ता. ११ ः स्व-रूपवर्धिनी संस्थेने शनिवारी (ता. १३) स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे. संस्थेच्या मंगळवार पेठेतील इमारतीत शनिवारी सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत हा स्नेहमेळावा आयोजित केला जाणार आहे. १३ मे १९७९ पासून संस्थेच्या कामास सुरवात झाली. गेल्या ४४ वर्षांपासून संस्थेला विविध घटकांकडून सहकार्य मिळते. या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व अनौपचारिक संवादासाठी संस्थेने स्थापनादिनानिमित्त स्नेहमेळावा आयोजित केला असल्याची माहिती संस्थेचे कार्यवाह विश्वास कुलकर्णी यांनी दिली.