Mon, Sept 25, 2023

स्कुल ऑफ आर्किटेक्चर
"स्कुल ऑफ आर्किटेक्चर ऍन्ड डिझाईन''चा पदवी प्रदान समारंभ संपन्न
स्कुल ऑफ आर्किटेक्चर "स्कुल ऑफ आर्किटेक्चर ऍन्ड डिझाईन''चा पदवी प्रदान समारंभ संपन्न
Published on : 11 May 2023, 5:05 am
पुणे, ता. ११ ः ‘स्कूल ऑफ आर्किटेक्चर ॲण्ड डिझाईन’ या संस्थेचा पदवीप्रदान समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. यावेळी २०२०, २०२१ व २०२२ या तीन वर्षांत पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पदवीप्रदान करण्यात आली. याप्रसंगी मुंबई येथील जे. जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्राचार्य राजीव मिश्रा, वास्तुविशारद डॉ. गौरी शिऊरकर, महाविद्यालयाचे संचालक प्रा.पुष्कर कानविंदे, प्राचार्य हेमंत साठ्ये, प्रा. सोनल निर्मल, तसेच विद्यार्थी, पालक उपस्थित होते. स्नेहा बेंद्रे व गरीमा सोमानी यांनी सूत्रसंचालन केले.