पादचारी पुलाचे होणार विस्तारीकरण

पादचारी पुलाचे होणार विस्तारीकरण

पुणे, ता. ११ ः पुणे स्थानकावरील फलाटाचे विस्तारीकरण होणार आहे. स्थानकाच्या सोलापूरच्या दिशेने असलेल्या फलाट १ वरून २ व ३ वर जाणाऱ्या पादचारी पुलाचे विस्तारीकरण करून तो फलाट ४, ५ व ६ ला जोडणार आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूरच्या दिशेने असलेल्या पादचारी पुलाचे विस्तारीकरण करण्याची मागणी प्रवाशांतून होत होती. मात्र, रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने पहिले नाही. गुरुवारी मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक धनंजय नाईक यांनी पुणे स्थानकाची पाहणी केल्यावर पुणे रेल्वे प्रशासनाला पुलाच्या विस्तारीकरच्या सूचना दिल्या आहेत. आता अभियांत्रिकी विभाग लवकरच आवश्यक त्या हालचाली करून पुलाच्या विस्तारीकरणाच्या कामाला सुरुवात करणार आहे.

प्रवाशांना दिलासा
पुणे स्थानकावर एकूण चार पादचारी पूल आहेत. त्यापैकी दोनच पादचारी पूल फलाट १ ते ६ दरम्यान सर्व फलाटांना जोडतात. त्यामुळे अनेक प्रवाशांना फलाट पाच व सहावर जाण्यासाठी चांगलीच दमछाक होते. आता सोलापूरच्या दिशेने असलेल्या पादचारी पुलाचे विस्तारीकरण होणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पुणे रेल्वे स्थानक दृष्टीक्षेप
रेल्वे गाड्या : २५०
प्रवासी संख्या : सुमारे दीड लाख
एकूण फलाट : ६
एकूण पादचारी पूल : ४

पुणे रेल्वे स्थानकावरील सोलापूरच्या दिशेने असलेल्या पादचारी पुलाचे विस्तारीकरण होणार आहे. मध्य रेल्वेच्या प्रधान मुख्य व्यवस्थापकांनी तशा सूचनाही दिल्या आहेत. अभियांत्रिकी विभागाकडून हे काम केले जाईल.
- डॉ मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com