‘लायन्स क्लब’तर्फे सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘लायन्स क्लब’तर्फे सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात
‘लायन्स क्लब’तर्फे सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात

‘लायन्स क्लब’तर्फे सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात

sakal_logo
By

पुणे, ता. १२ : जिल्ह्याच्या विविध भागातील गरजू तरुण-तरुणींचा सामुदायिक विवाह सोहळा कोंढवा परिसरातील साळवे गार्डन येथे उत्साहात पार पडला. लायन्स क्लब ऑफ पुणे गॅलॅक्सीतर्फे आयोजित या सामुदायिक विवाह सोहळ्याचा नऊ वधू-वरांनी लाभ घेतला. यावेळी उपक्रमास पुणे जिल्हा पत्रकार संघ, जिजाई सोशल फाउंडेशन, तात्यासाहेब ढमाले प्रतिष्ठान यांचे सहकार्य लाभले.
लायन्स क्लब ऑफ पुणे गॅलॅक्सीतर्फे वधु-वरांस ६५ भाड्यांचा सेट, प्रेशर कुकर, स्टीलची कपाटे, शालू, मंगळसूत्र, दागिने, जोडवी, शेरवानी भेट देण्यात आली. वधु-वरांस शुभाशिर्वाद देण्यासाठी नारायणपूरचे नारायण महाराज यांची उपस्थिती महत्त्वाची ठरली. याप्रसंगी क्लबचे माजी आंतरराष्ट्रीय संचालक नरेंद्र भंडारी, ज्येष्ठ सहकारी शाम खंडेलवाल, दीपक लोया, दिनकर शिलेदार, कल्याणकुमार गुजराथी, राजेंद्र गुगळे, सतीश मुळे, डॉ. प्रशांत मंजिरे, अध्यक्षा रेखा आखाडे, मंदाकिनी माळवदे आदी मान्यवर उपस्थित होते.