विविध रुग्णालयांमध्ये परिचारिका दिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विविध रुग्णालयांमध्ये परिचारिका दिन उत्साहात
विविध रुग्णालयांमध्ये परिचारिका दिन उत्साहात

विविध रुग्णालयांमध्ये परिचारिका दिन उत्साहात

sakal_logo
By

पुणे, ता. १२ : शहरातील विविध रुग्णालयांमध्ये परिचारिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. उल्लेखनीय कार्य करणाऱ्या परिचारिकांचा यानिमित्त गौरव केला, अशी माहिती वेगवेगळ्या रुग्णालयातर्फे देण्यात आली.
फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांची जयंती आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून साजरी केली जाते. परिचारिकांच्या योगदानाचा गौरव करण्याचा आणि त्यांचे महत्त्व पटवून देणे हे या दिवसाचे महत्त्व आहे. या निमित्ताने भारती हॉस्पिटल येथे संपूर्ण आठवडा कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यात विविध गुणदर्शन, फूड स्टॉल, पोस्टर प्रदर्शन अशा कार्यक्रमांचा समावेश होता. फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून आज उत्कृष्ट सेवा बजावलेल्या परिचारिकांचा सन्मान करण्यात आला. तसेच स्पर्धा जिंकलेल्या परिचारिकांना बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मंदार करमरकर, उपप्राचार्या डॉ. प्रिसिला जोशी, भारती हॉस्पिटलचे उपसंचालक डॉ. जितेंद्र ओसवाल, नर्सिंग सुप्रिटेंडन लेफ्टनंट कर्नल रोजी बाबू (निवृत्त), मेट्रन वैशाली धोंगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात परिचारिका दिन साजरा करण्यात आला. माजी अधिसेविका मंगल जोशी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, उपअधिष्ठाता डॉ. नरेश झंजाड, मुख्य प्रशासकीय अधिकारी गणेश बडदरे, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या कल्पना कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. राजू वरयानी यांच्या हस्ते परिचारिका दिनानिमित्त वेगवेगळ्या रुग्णालयातील ७५ परिचर्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी डॉ. संजय पाटील, डॉ. गीतांजली शर्मा, डॉ. पद्मा अय्यर, डॉ. वीरेंद्र ओसवाल उपस्थित होते.