Thur, Sept 21, 2023

कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
Published on : 12 May 2023, 5:32 am
पुणे, ता. १२ : विधी महाविद्यालयात तृतीय वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज रावसाहेब गर्जे (वय २२) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. राज हा मराठवाडा मित्रमंडळ लॉ कॉलेजमधील तृतीय वर्गात शिकत होता. एका तरुणाने त्रास दिल्याच्या कारणावरून त्याने मंगळवारी (ता. ९) वसतिगृहातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी मृत्युपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळून आली आहे. याबाबत मुलाचे वडील रावसाहेब गर्जे (रा. पाटस, जि. बीड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी निरुपम जयवंत जोशी या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.