‘सरहद’च्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत यश
कात्रज, ता. १३ : सरहद शाळेतील विद्यार्थ्यांनी दहावीच्या (सीबीएसई) परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. यामध्ये शाळेतील २५ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांच्या पुढे गुण मिळाले. तर, ४१ विद्यार्थ्यांना ८० ते ८९ टक्क्यांच्या दरम्यान गुण मिळाले. शाळेतून प्रथम क्रमांक रेणुका गायकवाड (९४.८० टक्के) या विद्यार्थिनीने पटकाविला. तर, द्वितीय क्रमांक वरद गायकवाड व राजसी गुल्हाने (९४.६० टक्के), तृतीय क्रमांक रोहित पासलकर (९४.४० टक्के) याने मिळविला.
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका कविता वानखेडे, पर्यवेक्षिका दीपाली कोंडे, स्वाती राऊत, उपपर्यवेक्षिका पल्लवी कदम यांचे मार्गदर्शन लाभले. सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार, विश्वस्त शैलेश वाडेकर, सचिव सुषमा नहार यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.