Fri, Sept 22, 2023

पाटील इस्टेट परिसरात दहशत पसरविणाऱ्यांवर मोका
पाटील इस्टेट परिसरात दहशत पसरविणाऱ्यांवर मोका
Published on : 13 May 2023, 4:11 am
पुणे, ता. १३ : पाटील इस्टेट परिसरात दहशत पसरविणाऱ्या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोका) कारवाई करण्यात आली. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी याबाबतचे आदेश दिले.
जमीर कंबर इराणी (वय २३), कासीम आबालू इराणी (वय २३), मोहंमद शौकत शेख (वय ३०), मेहंदीहसन कंबर इराणी (वय ३०), जैनब फिदा इराणी (वय २१), शहजादी ऊर्फ मुथडी जावेज इराणी (वय ४३), सोगरा ऊर्फ नर्गीस समीर इराणी (वय २४, सर्व रा. महात्मा गांधी वसाहत, जुना मुंबई-पुणे रस्ता, पाटील इस्टेट परिसर) अशी मोका कारवाई केलेल्या गुंडांची नावे आहेत. इराणी टोळीने पाटील इस्टेट परिसरात दहशत पसरविला होती. या प्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.