वस्त्यांमधील मुलांनी लुटला सुटीचा आनंद

वस्त्यांमधील मुलांनी लुटला सुटीचा आनंद

पुणे, ता. १३ ः उन्हाळ्याची सुट्टी लागल्यानंतर घरात किंवा परिसरातच खेळण्यात, बागडण्यात वस्त्यांमधील मुलांचा दिवस जातो. परंतु मार्केट यार्ड परिसरातील वस्त्यांमधील सुमारे १२५ मुलांनी उन्हाळी शिबिरामध्ये सहभाग घेत सुट्टीचा आणि गावाकडील पाहुणचाराचा आनंद घेतला. विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, शेतात, रानावनात फिरण्याचा आनंद व समुहाबरोबर राहण्याचा आनंदही यावेळी मुलांनी घेतला.
वस्त्यांमधील मुलांसाठी काम करणाऱ्या बाल शिक्षण मंच या संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही अकोले (ता. मुळशी) या गावामध्ये उन्हाळी शिबिर आयोजित केले होते. यामध्ये १२५ मुलांनी सहभाग घेतला.
नुकत्याच झालेल्या शिबीराचे उद्‌घाटन जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य लक्ष्मीबाई सातपुते यांच्या हस्ते झाले. त्यानंतर राज्य बोर्डाचे माजी सहसचिव व व्याख्याते अनिल गुंजाळ, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या मानसशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. पल्लवी कासंडे, गिर्यारोहक मिलिंद देशपांडे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बहाळकर, यार्दी वस्ती विकास प्रकल्पाचे शिवानंद साठे, लेखिका तमन्ना इनामदार, प्रबोधन व्याख्याते राघवन कोळी, व्यावसायिक शिक्षण विभाग प्रमुख माधवी शिंदे, आदित्य शिंदे, दिगंबर बिराजदार यांनी शिबिरातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
संस्थेचे अध्यक्ष अमर पोळ म्हणाले, ‘‘दररोज पहाटे झुंबा, त्यानंतर व्यायामाने मुलांचा दिवस सुरु होत असे. नदीवर अंघोळ झाल्यानंतर मुले विविध प्रकारच्या व्याख्यानांचे लाभ घेत होते. विविध खेळ, स्पर्धा, स्वच्छता अशा कार्यक्रमांमध्ये मुले उत्साहाने सहभागी होत. गावातील प्रथा परंपरा, धार्मिक भावना, गावातील जीवन मुलांनी समजून घेतले. दरम्यान, गावातील प्लॅस्टिक कचरा गोळा करून श्रमदानही केले.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com