पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या
पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

sakal_logo
By

पुणे, ता. १३ : मालमत्तेसाठी पत्नी व तिच्या आई-वडिलांनी त्रास दिल्याने पतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात सासरच्या पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
संतोषकुमार बाबासाहेब कोरे असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी रवीना संतोषकुमार कोरे (रा. वरवंड), रंजना दामोदर इरळे, दामोदर इरळे, संग्राम दामोदर इरळे आणि गणेश दिवेकर या पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत यशोदा बाबासाहेब कोरे (वय ५५, रा. सोलापूर) यांनी फिर्याद दिली. हा प्रकार २१ नोव्हेंबर २०१९ ते ३१ ऑगस्ट २०२२ या दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष कुमार यांचा त्याची पत्नी रवीना, सासू रंजना इरळे, सासरे दामोदर इरळे यांनी संपत्तीसाठी छळ केला. त्यामुळे संतोषकुमार यांनी ३१ ऑगस्ट २०२२ रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर आरोपींनी त्याच्या बँक खात्यावरून पैसे काढून पैशांचा गैरव्यवहार केला. तसेच, त्याच्या नावावर असलेले फ्लॅट व जागा बनावट कागदपत्रे सादर करून आरोपी रवीना हीने स्वतःच्या नावावर करून तक्रारदार यशोदा कोरे यांची फसवणूक केली आहे. न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.