गुंतवणुकीच्या आमिषाने एक कोटीचा गंडा

गुंतवणुकीच्या आमिषाने एक कोटीचा गंडा

पुणे, ता. १३ : बिटकॉईनमध्येमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एका व्यावसायिकाला ऑनलाइन एक कोटी १२ लाख ६० हजार रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपींवर सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत हरिश्चंद्र राजाराम काळे (वय ४६, रा. वडगाव शेरी) यांनी आरोपीविरोधात सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार डॅनियन कुपर आणि अलेक्झांडर हूडहेड आणि अज्ञात दोन मोबाईल धारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २० सप्टेंबर २०२१ पासून सुरू होता. आरोपी डॅनियन कुपर आणि अलेक्झांडर हुडहेड यांनी तक्रारदार हरिश्चंद्र काळे यांच्याशी मोबाईल व मेलद्वारे संपर्क केला. त्यांना ट्रेडएक्स डॉट कॉम ट्रेडिंग साईटमध्ये मधून बोलत असल्याचे भासवले. सदर वेबसाइटच्या माध्यमातून क्रिप्टो करन्सी असलेल्या बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केल्यास, मोठ्या प्रमाणावर परतावा मिळेल असे आमिष आरोपींनी दाखवले. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक मीनल सुपे पाटील करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com