संभाजी महाराज यांचा इतिहास घरोघरी पोचविण्याची गरज : धुमाळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संभाजी महाराज यांचा इतिहास 
घरोघरी पोचविण्याची गरज : धुमाळ
संभाजी महाराज यांचा इतिहास घरोघरी पोचविण्याची गरज : धुमाळ

संभाजी महाराज यांचा इतिहास घरोघरी पोचविण्याची गरज : धुमाळ

sakal_logo
By

पुणे, ता. १३ : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र सध्या जातीयवादात विभागला जात आहे. धर्माचे राजकारण करून समाजात वितुष्ट निर्माण केले जात आहे, या सगळ्याला मूठमाती द्यायची असेल, तर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचा इतिहास घरोघरी पोचविण्याची गरज आहे,’’ असे मत संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत धुमाळ यांनी शनिवारी व्यक्त केले.

संभाजी ब्रिगेडच्यावतीने संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला डेक्कन येथील त्यांच्या पुतळ्यासमोर मशाल उत्सव आयोजित करण्यात आला होता. या वेळी अध्यक्ष उत्तम कामठे, विराज तावरे, मंदार बहिरट, रोहित ढमाले, रेखा कामठे, कुमार गायकवाड, शिवाजी शिंदे, संगीता भालेराव आदी उपस्थित होते. धुमाळ यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

धुमाळ म्हणाले, ‘‘संभाजी महाराज हे उत्तम संस्कृत भाषा पारंगत होते. याबरोबरच ते साहित्यिक, धर्मचिकित्सक व प्रयत्नवादी होते. शिवाजी महाराज व जिजाऊ माँसाहेब यांनी शंभुराजे यांना कधीही दैववादी शिक्षण दिले नाही. त्यांना कर्तृत्वाचा इतिहास शिकविला, बौद्धिक शिक्षण दिले. त्याप्रमाणे त्यांना राजकीय, कला, संस्कृत, मराठी व इतर भाषांचे शिक्षण दिले. युद्धकलेत पारंगत केले. तरुणांनी संभाजी महाराजांचा आदर्श घेण्याची गरज आहे.’’ अक्षय रणपिसे, मुकेश यादव, सुशील पवार, राकेश सुतार यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.