आयसीएसईचा ९८.९४; तर 
आयएससीचा ९६.९३ टक्के निकाल

आयसीएसईचा ९८.९४; तर आयएससीचा ९६.९३ टक्के निकाल

पुणे, ता. १४ : द कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्सतर्फे (सीआयएससीई) घेण्यात येणाऱ्या आयसीएसईच्या (दहावी) परीक्षेत ९८.९४ टक्के, तर आयएससी (बारावी) परीक्षेत ९६.९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सीआयएससीईतर्फे या दोन्ही परीक्षांचा निकाल रविवारी दुपारी जाहीर करण्यात आला.

देश-विदेशातील दोन हजार ६१६ शाळांमधील दोन लाख ३७ हजार ६३१ विद्यार्थ्यांनी आयसीएसई परीक्षा दिली. यात परीक्षा दिलेल्या एक लाख नऊ हजार ५०० विद्यार्थिनींपैकी तब्बल ९९.२१ टक्के विद्यार्थिनी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. तर आयएससीची परीक्षा ९८ हजार ५०५ विद्यार्थ्यांनी दिली. त्यातील जवळपास ४६ हजार ७२४ विद्यार्थिनींनी बारावीची (आयएससी) परीक्षा दिली असून त्यातील ९८.०१ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. आयसीएसई परीक्षेत एकूण ६३ लेखी विषयांचे पेपर होते. त्यात २१ भारतीय भाषा आणि १४ परदेशी भाषा यांसह दोन क्लासिकल भाषा विषयांचा समावेश होता. तर आयएससी परीक्षेत एकूण ४७ लेखी विषयांचे पेपर झाले. त्यात १२ भारतीय भाषा आणि तीन परदेशी भाषा आणि एक क्लासिकल भाषा या विषयांचा समावेश होता.

देशात आयसीएसई परीक्षेत पश्चिम विभागात ९९.८१ टक्के इतके सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर दक्षिण विभागातील ९९.६९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर आयएससी परीक्षेत दक्षिण विभागातील ९९.२० टक्के असे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर त्याखालोखाल पश्चिम विभागातील ९८.३४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

निकालाची आकडेवारी
तपशील एकूण विद्यार्थी विद्यार्थिनी उत्तीर्णतेची टक्केवारी
आयसीएसई २,३७,६३१ १,२८,१३१ १,०९,५०० ९८.९४
आयएससी ९८,५०५ ५१,७८१ ४६,७२४ ९६.९३

विभागनिहाय निकाल
आयसीएसई
तपशील उत्तर पूर्व पश्चिम दक्षिण परदेशातील विद्यार्थी
उत्तीर्ण झालेले ७९,७९८ ७४,११४ ३१,९८६ ४८,५०१ ७१५
अनुत्तीर्ण विद्यार्थी १,०९४ १,१५४ ६२ १५२ ५५
एकूण विद्यार्थी ८०,८९२ ७५,२६८ ३२,०४८ ४८,६५३ ७७०

आयएससी
तपशील उत्तर पूर्व पश्चिम दक्षिण परदेशातील विद्यार्थी
उत्तीर्ण झालेले ४४,६०६ ३५,१७९ ६,५८७ ८,८०३ ३०८
अनुत्तीर्ण झालेले १,६१२ १,२२५ १११ ७१ ०३
एकूण विद्यार्थी ४६,२१८ ३६,४०४ ६,६९८ ८,८७४ ३११

गुणवत्ता यादीत आलेले राज्यातील विद्यार्थी
- आयसीएसई परीक्षेत श्रेया उपाध्ये (बॉम्बे स्कॉटिश स्कूल, मुंबई), अद्वय सरदेसाई (चॅम्पियन स्कूल, मुंबई), यश भासैन (सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल, ठाणे), तनय शहा (कपोल विद्यानिधी इंटरनॅशनल स्कूल, मुंबई) हे ९९.८० टक्के गुण मिळवीत देशात पहिल्या क्रमांकावर आहेत.
- आयएससी परीक्षेत इप्शिता भट्टाचार्य (सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल, ठाणे) हिने ९९.७५ टक्के गुण मिळवीत देशपातळीवरील गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com