मातृदिनानिमित्त ‘द फरगॉटन मदर्स’ उपक्रम

मातृदिनानिमित्त ‘द फरगॉटन मदर्स’ उपक्रम

पुणे, ता. १४ ः जागतिक मातृदिनानिमित्त व्हेगन इंडिया मूव्हमेंटतर्फे ‘द फरगॉटन मदर्स’ या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मानवी जीवनात प्राण्यांचा होणारा वापर, शोषण आणि त्यांच्यावरील अत्याचारामुळे वेदना सहन करणाऱ्या या प्राण्यांच्या मातांची वेदना या कार्यक्रमाद्वारे अधोरेखित करण्यात आली. यावेळी व्हेगन इंडिया मूव्हमेंटच्या शेकडो कार्यकर्त्यांनी प्राण्यांचे मुखवटे घालून प्राण्यांना होणाऱ्या वेदना व्यक्त केल्या. तसेच विविध फलक, छायाचित्रे आणि व्हिडिओच्या माध्यमातून संदेश देण्यात आला. पोल्ट्री उद्योगाची गरज म्हणून कोंबडीला २०० अंडी घालण्यास भाग पाडणारी यंत्रणा, दुग्धशाळेत दरवर्षी गायी आणि म्हशींचे केले जाणारे कृत्रिम रेतन अशा एक ना अनेक कारणांनी प्राण्यांच्या मातांना भोगाव्या लागणाऱ्या दुःख यावेळी प्रात्यक्षिकेच्या माध्यमातून सादर करण्यात आले. मातृत्वाचा अनुभव केवळ मानवापुरताच मर्यादित नसून इतर प्राणीमात्रांमध्ये देखील या भावनेला महत्त्व असते, याचा यावेळी प्रत्यय आला. मानवाप्रमाणेच प्राणी आपल्या मुलांची काळजी घेतात, त्यांचे रक्षण करतात आणि मुलांना इजा झाल्यास ते देखील कासावीस होतात, हे मानवाने समजून घेण्याची गरज असल्याचे व्हेगन इंडिया मूव्हमेंटच्या कार्यकर्त्यांनी अधोरेखित केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com