Sun, Sept 24, 2023

‘डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’च्या
अधिवेशनात पवार यांची उपस्थिती
‘डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’च्या अधिवेशनात पवार यांची उपस्थिती
Published on : 15 May 2023, 2:44 am
पुणे, ता. १५ ः ‘डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’चे येत्या शुक्रवारी (ता.१९) मे राज्यस्तरीय महाअधिवेशन होणार आहे. या अधिवेशनामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करणार आहे.
‘डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’चे संस्थापक अध्यक्ष सुकुमार कांबळे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे, समन्वय अनिल हातागळे उपस्थित होते. सातारा रस्त्यावरील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह येथे शुक्रवारी सायंकाळी चार वाजता हा कार्यक्रम होणार आहे. अधिवेशनाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते होईल. यावेळी माजी आमदार लक्ष्मण माने उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी शाहीर सचिन माळी व शीतल साठे यांचा महाजलसा कार्यक्रम दुपारी दोन वाजता होणार आहे.