पुणे आरटीओचे 
नागरिकांना आवाहन

पुणे आरटीओचे नागरिकांना आवाहन

पुणे, ता. १५ ः ओला, उबेरच्या रिक्षांना व दुचाकीची सेवा देणाऱ्या रॅपीडो कंपनीस अग्रिग्रेटरचा परवाना नाकारल्यानंतर आता परिवहन विभाग अॅप आधारित प्रवासी सेवा देणाऱ्या वाहनासाठी नवीन नियमावली तयार करीत आहे. केंद्र सरकारच्या सूचनांचा विचार करून पुणे आरटीओ कार्यालय नागरिकांच्या या सेवेबाबत नागरिकांचे अभिप्राय मागवीत आहे. जेणेकरून नागरिकांच्या सूचनांचा आधार घेऊन नवीन नियमावलीत तयार करताना आवश्यक त्या सूचनांचा विचार होऊ शकतो. तेव्हा नागरिकांनी आपल्या सूचना, अभिप्रायdycommr.enfl@gmail. com या मेल अथवा पुणे आरटीओ कार्यालयात प्रत्यक्ष येऊन कळवावे, या सूचना २० मेपर्यंत कळवावे, असे आवाहन पुणे आरटीओने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com