Wed, Sept 27, 2023

सूर्यदत्त नॅशनल स्कूलचा शंभर टक्के निकाल
सूर्यदत्त नॅशनल स्कूलचा शंभर टक्के निकाल
Published on : 16 May 2023, 8:56 am
पुणे: ता. १६ : सूर्यदत्त नॅशनल स्कूलचा (सीबीएसई) दहावी आणि बारावीचा शंभर टक्के निकाल लागला आहे. दहावीच्या वर्गात सम्यक कुमार याने ९६.२ टक्के गुणांसह शाळेत प्रथम स्थान मिळविले. शाळेने आठ वर्ष सलग उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. बारावीच्या वर्गात आरव सुराणा याने (विज्ञान प्रवाह) ९८ टक्के गुणांसह शाळेत प्रथम स्थान मिळविले आहे. १५० पैकी ४९ विद्यार्थ्यांना ९० टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळाले आहेत. या कामगिरीबद्दल सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक डॉ. संजय चोरडिया व संस्थेच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांनी गुणवंत विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले.