के अँड क्यू परिवार

के अँड क्यू परिवार

गेली १० वर्षे या न त्या कारणामुळे ‘के अँड क्यू परिवार’ पुणेकरांच्या वैचारिक प्रवासात सोबती राहिला. स्वतः चे जगणे समृद्ध केले. नऊ सदस्यांच्या जोरावर सुरु केलेला हा परिवार, आज दोनशेच्या घरात पोहोचला आहे. आज बुधवारी (ता. १७) ‘के अँड क्यू परिवार’ दशकपूर्ती करीत आहे. त्यानिमित्ताने...
- सत्येंद्र राठी,
प्रमुख, के अँड क्यू परिवार

जगणे रसरशीत करायला ज्या गोष्टी पूरक असतात, त्यातील काव्य, शास्त्र, विनोद, कला, साहित्य, संगीत, सामाजिक समज, अध्यात्म, आरोग्य, पर्यावरण, इतिहास अशा अनेक विषयाला स्पर्श करायचेच राहून जाते. मग या मार्गावर पुढे जायचे म्हणून, आम्ही व्यावसायिक, डॉक्टर, आर्किटेक्ट, सनदी लेखापाल, इंजिनिअर, प्राध्यापक, माजी ‘आयएएस’ अधिकारी, उद्योजक, व्याख्याते आदी मंडळींनी एकत्र येत १७ मे २०१३ रोजी ‘के अँड क्यू परिवार’ नावाने समूहाची सुरवात केली. या आद्याक्षरांचा अर्थ, नॉलेज अँड क्वेश्चन. उद्देश्य हाच की समाजातील घडामोडी समजून घेणे, त्या विषयातील तज्ज्ञ मंडळींना भेटणे किंवा त्यांना सन्मानपूर्वक बोलावून तो विषय समजून घेणे.
या प्रवासाला पुढे नेण्यासाठी इतिहास तज्ज्ञ प्रा. गणेश राऊत, सिने अभ्यासक सुलभा तेरणीकर, संगीत उपचारक शशांक कट्टी, वनस्पती मित्र हेमलता साने, प्रवचनकार शिरीष लिमये, सवाईचे उपेंद्र भट, लोकपाल आंदोलक अण्णा हजारे, समुपदेशक गौरी कानिटकर यांनी मार्गदर्शन केले. वैशाली रेस्टॉरंटच्या १२५ सेवकांचा कामगार दिनानिमित्त सन्मान केला गेला. अभिनेते नाना पाटेकर यांच्या ‘नाम’ संस्थेस एक भरीव रक्कम सुपूर्द केली.
प्राणांतिक आजाराने ग्रस्त मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ‘मेक अ विश’ फाउंडेशनच्या विद्यमाने त्यांना हव्या त्या वस्तु उपलब्ध करून दिल्या गेल्या. विद्यार्थ्याच्या जेवणाची समस्या असो किंवा कोणा खेळाडूला कमी पडलेला निधी, साहित्य आगीत भस्मसात झाल्याने रोखले गेलेले लग्न असो वा टांगेवाला कॉलनीचा पूर, प्रत्येक अडचणीत संबंधितांना साथ देण्यासाठी ‘के अँड क्यू परिवार’ तत्पर राहिला. सकाळ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून कोरोनाकाळात श्रमिक, बँड पथक, विद्यार्थी, बहुरूपी, पाथरवट, कातकरी समाजाला शिधा दिला. ‘घर घर तिरंगा’ मोहिमेत सहभाग घेतला. ‘वस्त्र दिवाळी’ म्हणत वस्ती भागातील मुला-मुलींना दिवाळीला नवे कपडे देण्याचा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतोच.
जुन्या सिनेमाच्या इतिहास कथा सांगण्याचा उपक्रमही पुणेकरांसाठी केला गेला. यात ‘मदर इंडिया’,‘मधुमती’ आदी सिनेमांच्या निर्मितीमागील कथा, दृक्‌श्राव्य माध्यमाने रसिकांपुढे मांडली. वीर पत्नी कॅप्टन प्रिया सेमवाल, तसेच आदिवासी कार्यकर्ती ठमाताई पवार यांना गौरविण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com