प्रवीण तरडे, काका पवार यांना पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रवीण तरडे, काका पवार यांना पुरस्कार
प्रवीण तरडे, काका पवार यांना पुरस्कार

प्रवीण तरडे, काका पवार यांना पुरस्कार

sakal_logo
By

पुणे, ता. १६ : प्रियांका महिला उद्योग संस्था व वसंतदादा सेवा संस्थेच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा ‘राजीव गांधी कला गौरव पुरस्कार’ लेखक, दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे यांना, तर ‘राजीव गांधी क्रीडा गौरव पुरस्कार’ अर्जुन पुरस्कार विजेते पहिलवान काका पवार यांना देण्यात येणार आहे.

वसंतदादा सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय बालगुडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत पुरस्कारांची घोषणा केली. ११ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गणेश कला क्रीडा रंगमंच येथे रविवारी (ता. २१) सायंकाळी ६ वाजता पुरस्कार वितरण कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात प्रवीण तरडे यांना माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या वेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, उल्हास पवार, आमदार रवींद्र धंगेकर, ‘सरहद’चे संजय नहार उपस्थित राहणार आहेत. तर ३१ मे रोजी नेहरू स्टेडियम येथे सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या कार्यक्रमात पहिलवान काका पवार यांना आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. या प्रसंगी महाराष्ट्र केसरी विकी बनकर, माजी मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित असणार आहेत.

फोटो - ४३३३४, ४३३३९