Fri, Sept 22, 2023

खंडणी देण्यास नकार; टपरीचालकाला मारहाण
खंडणी देण्यास नकार; टपरीचालकाला मारहाण
Published on : 16 May 2023, 5:28 am
पुणे, ता. १६ : पानटपरी चालविण्यासाठी दरमहा खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे गुंड टोळक्याने टपरीचालकाच्या कुटुंबाला बांबूने मारहाण केली. ही घटना हडपसर येथील काळेपडळ परिसरात रविवारी रात्री साडेनऊ वाजता घडली. या संदर्भात एका ५२ वर्षीय टपरीचालकाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार वानवडी पोलिसांनी प्रशांत तिकोटे (रा. काळेपडळ, हडपसर) आणि त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी पानटपरी चालवितात. तिकोटे आणि त्यांच्या साथीदारांनी त्यांना पानटपरी चालविण्यासाठी दर महिन्याला दोन हजार रुपये खंडणी मागितली. परंतु त्यांनी त्यास नकार दिला. त्यावर गुंडांनी फिर्यादी, त्यांचा मुलगा आणि पत्नी पानटपरीवर असताना त्यांना बाबूने मारहाण करून परिसरात दहशत निर्माण केली. या मारहाणीत त्यांच्या पत्नीचा हात मोडून गंभीर दुखापत झाली आहे.