रोटरीच्या वतीने पुरस्काराचे वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोटरीच्या वतीने पुरस्काराचे वितरण
रोटरीच्या वतीने पुरस्काराचे वितरण

रोटरीच्या वतीने पुरस्काराचे वितरण

sakal_logo
By

पुणे, ता. १६ ः रोटरी क्लब डेक्कन जिमखानाच्या वतीने विविध क्षेत्रांत उत्तम कामगिरी करणाऱ्यांचा ‘व्होकेशनल एक्सलन्स’ (व्यावसायिक गुणवत्ता) या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या प्रसंगी रोटरी क्लब टिळक रोडचे अध्यक्ष डॉ. अमित आंद्रे, रोटरी क्लब एनआयबीएमचे अध्यक्ष मनोज भाटे, रोटरी क्‍लब डेक्कन जिमखानाचे सचिव डॉ. उमेश फालक, भरत दाभोळकर, सामाजिक कार्यकर्ता दीपा भाजेकर आदी उपस्थित होते.

शिकाऊ उमेदवार भरती
पुणे, ता. १६ ः महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाद्वारे शिकाऊ उमेदवार या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ मे ठेवण्यात आली आहे. याबाबतची माहिती तसेच अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना www.apprenticeship.gov.in या संकेतस्थळाचा वापर करता येईल. दरम्यान उमेदवारांनी ऑनलाइन भरलेल्या अर्जाची प्रत विभाग नियंत्रक, रा. प. विभागीय कार्यालय, शंकरशेठ रस्ता येथे २५ ते २९ मे या कालावधीत समक्ष हजर राहून सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे महाअधिवेशन
पुणे, ता. १६ ः डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे राज्यस्तरीय महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये मातंग समाजाच्या प्रश्‍नांवर चर्चा होणार असून स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर देखील सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात या समाजाची स्थिती यावर वक्त्यांचे व्याख्यान होणार आहे. हे अधिवेशन शुक्रवारी (ता. ११) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह येथे होणार असून याचे उद्‍घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण माने उपस्थित राहणार असल्याची माहिती डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष सुकुमार कांबळे यांनी दिली.

यकृत विकारासंबंधी परिषद संपन्न
पुणे, ता. १६ ः बदलत्या जीवनशैलीमुळे पोट विकार, यकृत विकार यासह महत्त्वाच्या अवयवांसंदर्भातील उपचार व शस्त्रक्रियेबाबत माहिती देणारी परिषद नुकतीच पार पडली. ही परिषद इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) आणि नेक्सटजेन जीआय सेंटरच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत ३५० पेक्षा अधिक डॉक्टरांनी सहभाग नोंदवला. यावेळी आतड्‍यातील जळजळीची लक्षणे, यकृत प्रत्यारोपणाची गरज, विघटित यकृत रोग, एंडोस्कोपीमध्ये प्रगती, लहान आतड्याचा अतिसार, लहान आतड्याच्या जखमांचे मूल्यमापन यासह इतर बाबींसंदर्भात तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.