मसापचे शाखा, कार्यकर्ता पुरस्कार जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मसापचे शाखा, कार्यकर्ता पुरस्कार जाहीर
मसापचे शाखा, कार्यकर्ता पुरस्कार जाहीर

मसापचे शाखा, कार्यकर्ता पुरस्कार जाहीर

sakal_logo
By

पुणे, ता. १६ ः महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ११८ व्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणारे उत्कृष्ट शाखा आणि कार्यकर्ता पुरस्कार जाहीर झाले आहेत. उत्कृष्ट शाखा पुरस्कार सांगली जिल्ह्यातील आटपाडी शाखेला, बाबूराव लाखे स्मृतिप्रीत्यर्थ वैशिष्ट्यपूर्ण शाखा पुरस्कार सोलापूर जिल्ह्यातील दामाजीनगर शाखेला देण्यात येणार आहे. रत्नाकर कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ उत्तम काम करणाऱ्या कार्यकर्त्यास देण्यात येणारे कार्यकर्ता पुरस्कार धुळे येथील डॉ. शशिकला पवार आणि पंढरपूर येथील कल्याण शिंदे यांना जाहीर झाले आहेत. रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. २७ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे मुख्य मार्गदर्शक डॉ. विवेक सावंत यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.