मातांनी मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी : डॉ. प्रभुणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मातांनी मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी : डॉ. प्रभुणे
मातांनी मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी : डॉ. प्रभुणे

मातांनी मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी : डॉ. प्रभुणे

sakal_logo
By

पुणे, ता. १६ : ‘‘आईवर अनेक जबाबदाऱ्या असल्याने रोज कामे करण्याचा दबाव असतो. नवीन मातांसाठी हे अधिक आव्हानात्मक असते. शारीरिक तसेच मानसिक तणावातून त्या जात असतात. अशा परिस्थितीत नवीन मातांनी त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेतली पाहिजे,‘‘ असा सल्ला स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. मंजूषा प्रभुणे यांनी दिली.
जागतिक मातृदिनानिमित्त कोथरूड हॉस्पिटलतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. प्रभुणे बोलत होत्या. या वेळी कोथरूड हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजेंद्र मिटकर, शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र गुंडावार, डॉ. संजना भारती, डॉ. प्राची अमराळे, डॉ. गिता वडरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. प्रभुणे म्हणाल्या, ‘‘गर्भवतींनी बाहेरील सर्व खाद्य पदार्थ खाणे टाळावे. डोहाळे लागल्यावर त्यावर ही नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. त्यांनी घरचाच आहार घ्यावा त्यातही काकडी, टोमॅटो, तूप, भरपूर पाणी आणि शारीरिक हालचाली ठेवाव्यात. आई ही कुटुंबाची गुढी असते. ती स्वस्थ्य आणि शिक्षित राहिली तर संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य उत्तम राहते. त्यामुळे प्रत्येक महिलेने स्वतःचे आरोग्य सांभाळावे.’’