लाकडी घाण्यावरील तेल निर्मिती उद्योग

लाकडी घाण्यावरील तेल निर्मिती उद्योग

पुणे, ता. १७ : रिफायनरी तेलाच्या वापरामुळे लाकडी घाणा तेल उद्योग जवळजवळ संपला होता; पण आता हृदय रोगासंबंधी जागृतीमुळे याला परत चांगले दिवस येत आहेत. केमिकल विरहित तेलापेक्षा लाकडी घाणा अर्थात कोल्ड प्रेस ऑइल खाण्याकडे ग्राहकांचा वाढता कल आहे.
वाढती मागणी असणाऱ्या या फायद्याच्या लघु उद्योगाविषयीचे प्रशिक्षण २७ व २८ मे रोजी पुणे येथे होणार आहे. यामध्ये कोल्ड प्रेस ऑइल म्हणजे काय, तेल उत्पादन व प्रक्रियेचे प्रकार, पॅकिंग व ब्रॅण्डींग, मशिनरी, पेंड प्रक्रिया व विक्री, व्यवसायाचे अर्थशास्त्र, सोशल मीडियाद्वारे मार्केटिंगच्या पद्धती याविषयी मार्गदर्शन होणार आहे. तसेच लाकडी घाणा युनिटला फिल्ड व्हिजिट व लाकडी घाण्यावर शेंगदाणा, तीळ व खोबरे यांचे तेल उत्पादन कसे घेतात, तेल प्रक्रिया कशी होते, पेंड कशी काढतात, पाण्याचे प्रमाण कसे असावे याचे प्रात्यक्षिकासहित मार्गदर्शन होणार आहे.
प्रतिव्यक्ती शुल्क पाच हजार रुपये.

व्यावसायिक लोणचे व्यवसाय
सध्या घरी लोणची तयार करण्यापेक्षा बाजारातून लोणचे विकत घेण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे. या परिस्थितीत व्यावसायिक पद्धतीची विविध लोणचे बनवून चांगला व्यवसाय करता येऊ शकतो. अशी सुमारे १० प्रकारची लोणची व्यावसायिकदृष्ट्या कशी तयार करावी व त्याचा व्यवसाय कसा सुरू करावा याबाबत मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण शनिवार (ता. २०) व रविवारी (ता. २१) होणार आहे. यामध्ये आंबा, लिंबू, कारले, चिंच, लसूण, लिंबू छुंदा, मिरची, आवळा, ड्रायफ्रूट, हळद, कच्ची पपई, शेवगा व मिक्स इत्यादी प्रकारच्या लोणचे प्रात्यक्षिकासहित तयार करण्यास शिकवले जाईल. याशिवाय लोणची टिकविण्याच्या पद्धती, ब्रॅण्डिंग, पॅकिंग, मार्केटिंग, व्यवसायासाठी करावयाची आर्थिक गुंतवणूक आदींबाबत गंधाली दिंडे यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. प्रतिव्यक्ती शुल्क चार हजार रुपये.
ठिकाण : एसआयआयएलसी, सकाळनगर, गेट क्र.१, बाणेर रस्ता, औंध, पुणे
संपर्क : ९१४६०३८०३१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com