येरवड्यात आयटीआय स्थापन करण्यास मंजूरी

येरवड्यात आयटीआय स्थापन करण्यास मंजूरी

पुणे, ता. १७ : येरवडा येथे नविन औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) स्थापन करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. या प्रशिक्षण केंद्रात नऊ विविध व्यावसायिक कोर्सचे प्रशिक्षण मिळणार असून वर्षभरात जवळपास ३७५ विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.
आमदार सुनील टिंगरे यांनी येरवडा येथे आयटीआय प्रशिक्षण केंद्र सुरू करावी, अशी मागणी राज्य सरकारकडे केली होती. तर तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात येरवडा येथे आयटीआय सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार बुधवारी येरवडा येथील आयटीआय संस्था स्थापन करण्यासाठीचा अभ्यासक्रम, पदनिर्मिती व त्यासाठीच्या आवश्यक खर्चास मंजुरी देण्याचे आदेश कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाने काढले.

हे कोर्स शिकविणार
येरवडा येथील आयटीआय प्रशिक्षण केंद्रात कॉम्प्युटर ऑपरेटर अ‍ॅण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, टूल अ‍ॅण्ड डायमेकर, मेकॅनिक मोटार व्हेईकल, मेकॅनिक ऑटो बॉडी रिपेअर, मेकॅनिक ऑटो पेंटिंग, फिटर, इलेक्ट्रिशियन आणि वेल्डर या पदांचा समावेश आहे. त्यात एकूण ३७६ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळणार असून त्यासाठी ४० विविध पदांच्या भरतीस मंजुरी दिली आहे.

येरवडा येथे आयटीआय संस्था स्थापन करण्यासाठी पाठपुरावा केला. या संस्थेतून प्रशिक्षण घेऊन चाकण, रांजणगाव परिसरात रोजगाराच्या संधी निश्चितपणे उपलब्ध होतील, असा विश्वास आहे.
- सुनील टिंगरे, आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com