पैठणीच्या घडीघडीतून उलगडल्या आठवणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पैठणीच्या घडीघडीतून 
उलगडल्या आठवणी
पैठणीच्या घडीघडीतून उलगडल्या आठवणी

पैठणीच्या घडीघडीतून उलगडल्या आठवणी

sakal_logo
By

पुणे, ता. १७ ः पैठणी, कांजीवरम, बनारसी शालू अशा ठेवणीतील साड्यांच्या आठवणीतून तनिष्का व्यासपीठाच्या सदस्यांनी अनमोल ठेवा, परंपरेचा रेशमी पटच उलगडला. निमित्त होतं मातृदिनाचं. वैशिष्ट्यपूर्ण साड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या टाटांच्या ‘तनाएरा’ या जंगली महाराज रस्त्यावरील साड्यांच्या दालनात तनिष्कांनी आईच्या साडीच्या आठवणी जागवल्या. व्यवस्थापक रूद्र मंद्रे यांनी प्रास्ताविक केले. घराण्याची, रितीरिवाजाची, कलाकुसरीची, प्रेमाची परंपरा आईची साडी जपते आणि तो पिढ्यांनपिढ्यांचा वारसा होतो. त्याच्या हृदय कहाण्या-मनोगत तनिष्कांनी या वेळी व्यक्त केले. काही तनिष्का आई, लेकीला, सासू, सुनेला, नातीला आवर्जून घेऊन आल्या होत्या. अशा जोडीने आलेल्या नीलिमा खानापूरकर, कविता फडके, अनिता कामठे आणि संगिता जगताप यांना ‘तनाएरा’तर्फे गिफ्ट व्हाउचर देण्यात आले.

PNE23T43556
पुणे ः तनिष्का व्यासपीठ आणि ‘तनाएरा’तर्फे झालेल्या कार्यक्रमात उपस्थित तनिष्का सदस्य.