निवृत्त जवानांसाठी व्यवस्थापन प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवृत्त जवानांसाठी 
व्यवस्थापन प्रशिक्षण
निवृत्त जवानांसाठी व्यवस्थापन प्रशिक्षण

निवृत्त जवानांसाठी व्यवस्थापन प्रशिक्षण

sakal_logo
By

पुणे, ता. १८ ः लष्कराचे येथील बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप (बीईजी) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या वतीने लष्करातून निवृत्त होणाऱ्या ज्युनिअर कमांडिंग ऑफिसर (जेसीओ) व जवानांसाठी व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या तीन दिवसीय कार्यक्रमाच्या माध्यमातून निवृत्तीनंतर नागरी क्षेत्रात कार्य करताना आवश्‍यक अशा कौशल्यावर भर देत लष्करी जवानांच्या शिस्त, कौशल्य आणि क्षमता याचा वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मॅनेजमेंट सायन्सेस विभागाच्या (पुम्बा) अंतर्गत हा कार्यक्रम कॅप्टन डॉ. सी. एम. चितळे (निवृत्त) आणि शंतनू किर्लोस्कर यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. या विभागाच्या प्रमुख डॉ. सुप्रिया पाटील यांनी देखील यामध्‍ये योगदान दिले. या कार्यक्रमामध्ये उद्योग आणि संबंधित विषयातील तज्ज्ञांनी निवृत्तीनंतर जवानांना नागरी जीवनाकडे अभिमुखता, आर्थिक व्यवस्थापन, संप्रेषण कौशल्ये आणि नेतृत्व या सारख्या गोष्टींवर मार्गदर्शन केले.