केळकर कुटुंबीयांकडून कृतज्ञ स्मरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केळकर कुटुंबीयांकडून कृतज्ञ स्मरण
केळकर कुटुंबीयांकडून कृतज्ञ स्मरण

केळकर कुटुंबीयांकडून कृतज्ञ स्मरण

sakal_logo
By

पुणे, ता. १८ : जागतिक संग्रहालय दिनी केळकर कुटुंबीयांनी पुणेकरांच्या वतीने दिनकर केळकर यांना आदरांजली अर्पण केली. केळकर यांच्या पुतळ्याला दिनकर केळकर यांचे पुतणे आणि ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. श्रीकांत केळकर, अरुणा श्रीकांत केळकर यांनी पुष्पहार अर्पण केला. डॉ. सुधन्वा रानडे, पुणेकर नागरिक यावेळी उपस्थित होते. संग्रहालय पाहायला आलेल्या विद्यार्थी, नागरिकांना डॉ. रानडे यांनी जागतिक संग्रहालय दिन तसेच कै. दिनकर केळकर यांची माहिती दिली
दरवर्षी १८ मे रोजी ‘जागतिक संग्रहालय दिन’ जगभर साजरा केला जातो. संग्रहालयात जपलेला वारसा, संस्कृती, इतिहास याला यानिमित्ताने उजाळा मिळावा, असा यामागचा उद्देश असतो. गेल्या ४० वर्षांपासून ही परंपरा चालू आहे. यानिमित्त जगभर संग्रहालय भेटी, प्रदर्शने, चर्चासत्रे असे उपक्रम आयोजित केले जातात, असे डॉ. केळकर यांनी सांगितले.