‘सरहद’मध्ये रंगला ‘कला -आविष्कार’

‘सरहद’मध्ये रंगला ‘कला -आविष्कार’

पुणे, ता. १८ ः कात्रज येथील सरहद कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्सतर्फे ‘कला -आविष्कार’ या आंतरमहाविद्यालयीन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, स्वरचित कवितावाचन स्पर्धा, भारूड व पोवाडा सादरीकरण स्पर्धांचे आयोजन केले होते. उद्‍घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्राध्यापक डॉ. तुकाराम रोंगटे यांच्या हस्ते झाले. त्यांनी ‘लोकसाहित्य संवादाच्या नव दिशा’ या विषयावर व्याख्यान दिले.
वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक ऋतुजा दाभाडे (सरहद महाविद्यालय), द्वितीय क्रमांक आस्था मेश्राम (सेंट जोसेफ कॉलेज, विरार मुंबई), तृतीय क्रमांक चैत्राली गोदावले (सरहद महाविद्यालय) या विद्यार्थिनींनी पटकावला. स्वरचित-कविता वाचन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक नम्रता अरसोड (अण्णासाहेब मगर महाविद्यालय हडपसर), द्वितीय क्रमांक उपेक्षा वंशिव आणि तृतीय क्रमांक निशा सय्यद (सरहद महाविद्यालय) या विद्यार्थिनींनी पटकावला. भारूड व पोवाडा सादरीकरण स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक माधवी पवार (श्रीमती मणिबेन एम. पी. शाह महिला स्वायत्त महाविद्यालय, माटुंगा मुंबई) द्वितीय वर्ष क्रमांक गौरव गायकवाड (अरिहंत महाविद्यालय पुणे) तर तृतीय क्रमांक साक्षी प्रभू यांच्या चमूने पटकावला. यावेळी सरहद संस्थेचे विश्वस्त शैलेश वाडेकर, प्राचार्य डॉ. हनुमंत जाधवर, कवी गोपाळ कांबळे, उपप्राचार्य डॉ. संगीता शिंदे, कला शाखा व मराठी विभाग प्रमुख डॉ. वंदना चव्हाण उपस्थित होते. सूत्रसंचालन मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांनी दिव्या कपाटे व पौर्णिमा शिंदे यांनी तर आभार डॉ. अनुपमा वाटकर यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com