
आरटीओच्या भरारी पथकाकडून १७ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई
आरटीओच्या भरारी पथकाकडून १७ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई
केवळ एकाच बस ने जास्त भाडे घेतल्याचे आढळले
पुणे,ता. १८ ट्रॅव्हल्स चालकांनी उन्हाळी सुट्ट्यामध्ये केलेल्या तिकीट दरात वाढीच्या पार्श्वभूमीवर आरटीओ प्रशासनाने ट्रॅव्हलची तपासणी मोहीम सुरु केली. यात सुमारे १७ ट्रॅव्हल्सवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र ही कारवाई परमीट नसणे, कर न भरणे, नोंदणी नसणे या प्रकरणी झाली आहे. भाडेवाढ केलेली एकही ट्रॅव्हल्स आरटीओ प्रशासनाला आढळून आलेली नाही.
सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरु आहेत. रेल्वेला दोन ते तीन महिन्याचे वेटिंग आहे. तर एसटीला प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे. याचाच फायदा घेत शहरातील काही ट्रॅव्हल्स चालकांनी तिकीट दरात प्रचंड वाढ केली आहे. या संदर्भात तक्रारी प्राप्त होताच पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) शहरातून सुटणाऱ्या ट्रॅव्हल्स बसची मंगळवारपासून तपासणी सुरू केली आहे.
पुण्यातून मराठवाडा व विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे.या भागात जाण्यासाठी रेल्वेची संख्या कमी आहे.ज्या रेल्वे आहेत.त्यांना दोन महिन्याचे वेटिंग आहेत.त्यामुळे प्रवाशांना ट्रॅव्हल्सवर अवलंबून राहावे लागते.याचाच गैरफायदा घेत ट्रॅव्हल्स चालक भाड्यात मोठ्या प्रमाणात वाढ करतात. परिणामी प्रवाशांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते.
------------
४० टक्क्यांची दरवाढ, पण आरटीओला आढळले नाही :
पुण्यात रोज सुमारे ९०० ट्रॅव्हल्स येतात आणि जातात. पुण्याहून नागपूर, अकोला, लातूर, नांदेड ला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. ट्रॅव्हल्स चालकांनी तिकीट दरात सुमारे तीस ते चाळीस टक्क्यांची वाढ केली आहे. यात मराठवाड्याला जाणाऱ्या बसची संख्या अधिक आहे.पण सह्हायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुजित डोंगरजाल यांच्या पथकाला भाडेवाढ केलेल्या फारशा ट्रॅव्हल्स बस आढळल्या नाहीत. १७ पैकी १ बसने भाडेवाढ केली आहे. उर्वरित बस मध्ये मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या बाबीवर कारवाई करण्यात आली.
--------------
कोट : आरटीओच्या पथकांकडून ट्रॅव्हल्स चालकावर कारवाई करण्यात येत आहे. आता पर्यंत १७ ट्रॅव्हल्स चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई अशीच सुरु राहील.
डॉ अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.