पुजारी यांना संत चोखामेळा पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुजारी यांना संत चोखामेळा पुरस्कार
पुजारी यांना संत चोखामेळा पुरस्कार

पुजारी यांना संत चोखामेळा पुरस्कार

sakal_logo
By

पुणे, ता. १९ ः भौतिक समृद्धी म्हणजे वैभव नाही. विश्वगुरुत्व वैभवात नाही तर विचारात असते, असे प्रतिपादन माणकोजी महाराज यांचे वंशज प्रकाश महाराज बोधले यांनी केले.
संत चोखामेळा अध्यासन केंद्र, पुणे व वृंदावन फाउंडेशन यांच्यातर्फे यंदाचा संत चोखामेळा समता पुरस्कार मंगळवेढा येथील प्राचार्य डॉ. अप्पासाहेब पुजारी यांना बोधले महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. संत चोखामेळा यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करणाऱ्या ज्येष्ठ प्रवचनकार व कीर्तनकार सुभद्रामाय खरात यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. याप्रसंगी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे विश्वस्त शिवाजीराव मोरे महाराज देहूकर, श्री संत तुकाराम महाराज देहू संस्थानचे पालखी सोहळा प्रमुख माणिकबुवा मोरे महाराज, संत चोखामेळा अध्यासन केंद्राचे संस्थापक सचिन पाटील, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. माणिक सोनवणे उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना डॉ. पुजारी म्हणाले, ‘‘माझ्या विचारांची धाटणी संशोधकाची असल्याने त्या नजरेने मी चोखोबांच्या साहित्याकडे पाहिले. आयुष्यात झालेल्या मोठ्या आघातामुळे माझी चोखाबांच्या विचारांशी भेट झाली. चोखोबा यांचे गुरू संत नामदेव आणि चोखोबा यांचे देह वेगवेगळे असले तरी मने एकरूप होती. गुरूने शिष्याचे चरित्र लिहावे असा संत म्हणजे संत चोखामेळा होय.’’ प्रास्ताविक सचिन पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सोमनाथ लांडगे यांनी केले. आभार प्रा. भाऊराव खुणे यांनी मानले.