कुलगुरू पदाची मुलाखत अंतिम टप्प्यात

कुलगुरू पदाची मुलाखत अंतिम टप्प्यात

पुणे, ता. १८ ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू निवड प्रक्रियेला सुरुवात झाली असून शुक्रवारी (ता.१९) मुलाखतीचा अंतिम टप्पा आहे. कुलगुरू पदासाठी अर्ज केलेल्या २७ उमेदवारांची मुलाखत गुरुवारी आणि शुक्रवारी पार पडत आहे. आता यातून पाच उमेदवारांची नावे निवडून राज्यपालांकडे पाठवली जातील. या पाच उमेदवारांची मुलाखत घेतल्यानंतर साधारणपणे मे महिना अखेरीस किंवा जून महिन्यात विद्यापीठाला नवीन कुलगुरू मिळतील, अशी शक्यता व्यक्त केली आहे.

विद्यापीठाचे माजी कुलगुरू नितीन करमळकर यांच्या निवृत्तीनंतर रिक्त झालेले कुलगुरू पद भरण्याबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुणे विद्यापीठातीलच सध्या कार्यरत असलेल्या ११ जणांनी कुलगुरू पदासाठी अर्ज केला आहे. विद्यापीठातील काही उमेदवारांच्या मुलाखती गुरुवारी झाल्या असून उर्वरित उमेदवार शुक्रवारी मुलाखतीला जाणार आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.


काय आहेत निकष ?
कुलगुरू पदाच्या पात्रतेचे निकष उपलब्ध आहेत. प्राध्यापक म्हणून दहा वर्षे काम केलेल्या व्यक्तीला कुलगुरू पदासाठी अर्ज करता येतो. परंतु, संबंधित उमेदवाराचा शैक्षणिक व प्रशासकीय अनुभव तपासला जातो. उमेदवाराने आत्तापर्यंत कोठे काय केले आहे? हे पाहिले जाते. वेब ऑफ सायन्सवरील व गुगल स्कॉलर साईटेशन, एच इंडेक्स, पब्लिकेशन्स आदी माहिती सुद्धा लक्षात घेतली जाते. उमेदवाराच्या नावे असणारे पेटेंट, विद्यापीठांच्या अधिकार मंडळावर केलेल्या कामाचा अनुभव, विद्यार्थ्यांसाठी राबवलेले विशेष उपक्रम, रिसर्च प्रोजेक्ट, उमेदवाराचा सोशल अवेअरनेस आदी गोष्टी मुलाखती दरम्यान पाहिल्या जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com