औंध जिल्हा रुग्णालयाचा ‘पीपीपी’तत्त्वावर विकास

औंध जिल्हा रुग्णालयाचा ‘पीपीपी’तत्त्वावर विकास

पुणे, ता. १९ : औंध येथील जिल्हा रुग्णालयाचा सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर विकास करण्याबाबत मंत्रालयात बैठक झाली. दरम्यान, ‘पीपीपी’च्या माध्यमातून रुग्णालयाचे खासगीकरण करण्याचा हा डाव असल्याचा आरोप ‘औंध जिल्हा रुग्णालय देखरेख व संवाद समिती’ने केला आहे.
औंध येथील जिल्हा रुग्णालयाचा ‘पीपीपी’तत्त्वावर विकास करण्याबाबतची बैठक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या दालनात झाली. याला ‘पीपीपी’ क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते. जागेची प्रत्यक्षात जाऊन पाहणी केल्यानंतर पुढील बैठकीत या विषयावर चर्चा केली जाणार असल्याची माहिती मिळाली. याबाबत आरोग्य खात्यातील प्रशासनाला कोणतीही कल्पना नाही.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यल्लमपल्ली म्हणाले, “या प्रकरणाची विचारणा करणारे अनेक दूरध्वनी आले आहेत. पण, याची कोणतीही माहिती स्थानिक प्रशासनापर्यंत आलेली नाही. त्यामुळे रुग्णालयातील नियमित कामे सुरु आहेत.”
दरम्यान, औंध जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय सेवांचे खासगीकरण कोणत्याही परिस्थितीत होऊ दिले जाणार नाही, असा पवित्रा औंध जिल्हा रुग्णालय देखरेख व संवाद समितीने घेतला आहे. समितीचे दीपक जाधव म्हणाले, ‘‘कोरोना उद्रेकानंतर सरकारी आरोग्य सेवांचा विस्तार व्हावा, त्या सक्षम व्हाव्यात अशी मागणी लोकांकडून होत आहे. त्याला सद्य:परिस्थितीत राजस्थान, केरळ, तमिळनाडूसारखी राज्ये सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. अशावेळी दुसरीकडे महाराष्ट्राचा आरोग्य विभाग मात्र सरकारी सेवांच्या खासगीकरणाचा डाव कसा आखू शकतो, याचे आश्चर्य वाटते आहे. राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी ही प्रक्रिया तातडीने थांबवावी व त्याबाबतची घोषणा करावी, अन्यथा याविरोधात मोठे आंदोलन उभे केले जाईल.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com