Fri, Sept 22, 2023

करिअर विकासाचे मोफत प्रशिक्षण
करिअर विकासाचे मोफत प्रशिक्षण
Published on : 19 May 2023, 2:33 am
पुणे, ता. १९ : साथी स्वयंसेवी संस्थेतर्फे सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसीय मोफत करिअर विकास प्रशिक्षणाचे शिबिर घेण्यात आले. यात करिअरबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील संस्थेत अभ्यास कसा करायचा, याचे मार्ग सांगण्यात आले. शिबिरांतर्गत विद्यार्थ्यांनी पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेला (आयसर) भेट दिली. हे शिबिर मुले आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी विनामूल्य होते.