कंत्राट मिळवून देण्याच्या आमिषाने फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कंत्राट मिळवून देण्याच्या आमिषाने फसवणूक
कंत्राट मिळवून देण्याच्या आमिषाने फसवणूक

कंत्राट मिळवून देण्याच्या आमिषाने फसवणूक

sakal_logo
By

पुणे, ता. १९ : कामाचे कंत्राट मिळवून देण्याच्या आमिषाने एका व्यावसायिकाची ८३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. १९ एप्रिल २०१८ ते मे २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला. या प्रकरणी राजेश कृष्णाथ एकबोटे (वय ५३, रा. बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून बिबवेवाडी पोलिसांनी हेमंत रायकुमार खिंवसरा यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी राजेश एकबोटे यांची किमया इन्फोटेक एलएलपी कंपनी आहे. या कंपनीमार्फत लॉटरी आणि बॅंकिंग व्यवसायासाठी ॲप्लिकेशन तयार करण्याचे काम केले जाते. एका व्यक्तीच्या माध्यमातून एकबोटे आणि खिंवसरा यांची ओळख झाली. त्यावेळी एकबोटे यांनी खिंवसरा यांच्यासोबत भागीदारीत प्रकल्प सुरू करण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर प्रकल्पाची वर्कऑर्डर मिळवणे, निविदा मिळविण्यासाठी संबंधित राजकीय व्यक्ती आणि अधिकाऱ्यांना रक्कम द्यावी लागेल, असे सांगून खिंवसरा आणि साथीदारांनी वेळोवेळी ८३ लाख रुपये घेतले. परंतु ही रक्कम परत न करता एकबोटे यांची फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.