Wed, Sept 27, 2023

कोंढव्यात वाहतुकीत बदल
कोंढव्यात वाहतुकीत बदल
Published on : 19 May 2023, 5:01 am
पुणे, ता. १९ : कोंढवा वाहतूक विभागाच्या हद्दीत पिण्याच्या पाइपलाइनचे काम सुरू आहे. त्यामुळे शितल पेट्रोल पंपाजवळील चौकाकडून ज्योती हॉटेल चौकाकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक १० जूनपर्यंत बंद करण्यात येणार आहे. पर्यायी मार्ग म्हणून वेलकम हॉल जंक्शन, मेफेअर सोसायटी जंक्शनमार्गे इच्छितस्थळी जाता येणार आहे. ज्योती हॉटेल चौक ते शितल पेट्रोल पंप अशी एकेरी वाहतूक सुरू राहणार आहे, असे आदेश शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी जारी केले आहेत.