Fri, Sept 22, 2023

गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक
Crime News : गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक
Published on : 20 May 2023, 12:38 pm
पुणे : गांजाविक्रीसाठी बिहारहून आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पुणे स्टेशन परिसरात अटक केली. त्यांच्याकडून ६३ किलो गांजा, दोन मोबाईल असा १२ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
मंतू रामबाबू राय (वय ३०, रा. कव्वा चौक, जोरापूर, जि. समस्तीपूर, बिहार) आणि राकेशकुमार रामनाथ दास (वय १९, रा. खुसरुपूर, जि. पाटणा, बिहार) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पुणे रेल्वे स्थानकामधील पार्सल विभागाजवळ दोघे गांजाविक्रीसाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलिस कर्मचारी योगेश मांढरे यांना मिळाली.
त्यानुसार केलेल्या कारवार्इत पोलिसांनी राय आणि दास यांना पकडले. त्यांच्याकडील पिशवीची झडती घेण्यात आली. त्यावेळी पिशवीत गांजा सापडला. दोघांविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.