अन् उलगडल्या आईच्या आठवणी...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अन् उलगडल्या आईच्या आठवणी...!
अन् उलगडल्या आईच्या आठवणी...!

अन् उलगडल्या आईच्या आठवणी...!

sakal_logo
By

पुणे, ता. २० : पाणावलेले डोळे...मऊसूत, भरजरी साड्यांचे ओलावलेले काठ अन् आईच्या मायेच्या तरल आठवणींनी आपसूकच कृतज्ञतेने मनापासून जोडले गेलेले हात...हे हृद्य वातावरण होते मातृदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातील..

तनिष्का व्यासपीठ आणि टाटा तनाएराच्या वतीने मातृदिनानिमित्त औंध येथील दालनात विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी ‘आईची साडी अन् आठवणी’ या विषयावर तनिष्का सदस्यांनी आपल्या भावनांना मोकळेपणाने वाट करून दिली. आठवणी सांगताना सदस्या त्यांच्या बालपणात रमल्या. या प्रसंगी तनिष्का सदस्यांनी मुलगी, सून, आई, जाऊ, सासू आणि बहिणीसोबत पारंपरिक वेशभूषा करून ‘रॅम्पवॉक’चा आनंद लुटला. कल्पकतेने वेशभूषा केलेल्या जयश्री वगनवार, माधुरी गिरमकर, शीतल शिंदे, स्वाती डिंबळे, प्रभावती गायकवाड, माधुरी रानवडे, लीना धावडे, स्वामिनी जाधव यांना ‘तनाएरा’तर्फे गिफ्ट व्हाऊचर देण्यात आले. व्यवस्थापक प्रज्ञा प्रियदर्शिनी यांनी प्रास्ताविक केले.

PNE23T43878