एथरची मागणी ४१ टक्क्यांनी वाढली

एथरची मागणी ४१ टक्क्यांनी वाढली

पुणे, ता. २० : देशातील आघाडीची इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपनी एथर एनर्जी आपल्या तंत्रज्ञानाच्या नावीन्यपूर्ण वापराद्वारे भारतीय इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) उद्योगात बदल घडवून आणण्यात आघाडीवर पोचली आहे. ईव्ही टू-व्हीलर वाहनांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. यंदा या वाहनांची मागणी एप्रिलअखेर ४१ टक्क्यांनी वाढली आहे. एथर एनर्जीने ईव्ही टू-व्हीलर विभागातील ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरली असून, स्वतःची ओळख निर्माण केली आहे. जेव्हा त्यांनी आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर, एथर ४५० सादर केली तेव्हा त्यांचा प्रभाव २०१८ मध्ये सुरू झाला. गुगल मॅप्स, टचस्क्रीन डॅशबोर्ड आणि पार्किंग ॲसिस्ट आदी वैशिष्ट्यांमुळे एथर देशातील पहिली स्मार्ट इलेक्ट्रिक स्कूटर झाली आहे. एथरची इलेक्ट्रिक स्कूटर यूएक्स, यूआय आणि व्हेक्टर मॅप्स, ऑटोहोल्ड तंत्रज्ञान, गाइड-मी-होम लॅम्प्स, थेफ्ट आणि टॉव डिटेक्शन, चार्जिंग करताना चोरीविरोधी यंत्रणा, जलद चार्जिंग आणि टीपीएमएस (टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम) सारख्या वैशिष्ट्यांसह परिपूर्ण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com