व्यावसायिकाच्या कुटुंबीयांना ५८ लाखांची भरपाई

व्यावसायिकाच्या कुटुंबीयांना ५८ लाखांची भरपाई

पुणे, ता. २० : टेम्पोने धडक दिल्याने मृत्यू झालेल्या व्यावसायिकाच्या कुटुंबीयांना ५८ लाख ५२ हजार ६७३ रुपये देण्याचा आदेश मोटार अपघात न्यायप्राधिकरणाने विमा कंपनीला दिला आहे. न्यायप्राधिकरणाचे सदस्य न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी हा निकाल दिला.
दि. न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात हा दावा दाखल करण्यात आला होता. दावा दाखल केल्याच्या तारखेपासून सात टक्के वार्षिक व्याजाने ही रक्कम द्यायची आहे. ४२ वर्षीय व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्याप्रकरणी त्याची पत्नी, तीन मुले आणि आई यांनी ॲड. एन. डी. वाशिंबेकर आणि ॲड. जे. के. बसाळे यांच्यामार्फत येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दावा दाखल केला होता. व्यावसायिक २२ मे २०१७ ला नगर-पुणे रस्त्यावर पायी रस्ता ओलांडत होते. त्या वेळी टेम्पोने त्यांना धडक दिली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे २८ मे २०१७ ला त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर जून २०१७ मध्ये नुकसानभरपाई मिळावी, यासाठी दावा दाखल केला होता. मृत्यू झालेल्या व्यक्तीचा टुर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय होता. त्‍यांचे वार्षिक उत्पन्न पाच लाख २५ हजार ९८८ रुपये होते. उत्पन्न, वय आणि अवलंबून असलेल्या व्यक्तीचा विचार करून अधिकाधिक नुकसान भरपाई देण्याची मागणी ॲड. वाशिंबेकर आणि ॲड. बसाळे यांनी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com