पुण्यात तिसऱ्या दिवशीही 
पाणीपुरवठा विस्कळित

पुण्यात तिसऱ्या दिवशीही पाणीपुरवठा विस्कळित

पुणे, ता. २० ः पाणी बचतीसाठी महापालिकेने एक दिवस पाणीपुरवठा (गुरुवारी) बंद ठेवायला सुरवात केली; पण त्याचा नागरिकांना सलग तिसऱ्या दिवशीही फटका बसला आहे. मध्यवर्ती पेठांसह, प्रभात रस्ता व उपनगरांमध्ये शनिवारी (ता. २०) अपुरा पुरवठा झाला. दरम्यान, महापालिकेने किती टँकर उपलब्ध करून दिले, याची माहिती मिळू शकली नाही.
अल निनोच्या प्रभावामुळे यंदा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ न झाल्यास गंभीर पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याचा धोका आहे. त्यामुळे महापालिकेने दर गुरुवारी पुरवठा बंद ठेवून पाणीबचतीचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी १८ मेपासून करण्यात आली आहे. मात्र शुक्रवारीही पाणीपुरवठा विस्कळित होताच, शिवाय शनिवारीही नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळाले.
महापालिकेने पूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन २० ठिकाणी एअर व्हॉल्व्ह बसविले आहेत. जलकेंद्राच्या टाक्या नेहमीपेक्षा दोन तास आधीच भरण्यात आल्या. टँकरची व्यवस्था सज्ज करून ठेवली, पण त्याचा फारसा फायदा शहरात झालेला दिसून आलेला नाही. शनिवारीही शहराच्या अनेक भागांत पुरेसे पाणी मिळालेले नाही. मध्यवस्तीतील पेठांमध्ये कमीदबाने पाणी आले. तसेच शिवाजीनगर गावठाण, गणेशखिंड रस्ता, प्रभात रस्ता, केशवनगर, मुंढवा, कात्रज-कोंढवा रस्त्याचा काही भाग, हडपसर यासह काही भागांमध्ये पाणी मिळालेले नाही.

केशवनगर भागात बुधवारी सायंकाळी पाणी गेले आहे, आज शनिवार अजूनही पाणी आलेले नाही. महापालिकेच्या नियोजनाचा फटका आम्हाला बसला आहे.
- अभिषेक सोमवंशी, नागरिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com