भटक्या कुत्र्यांसंदर्भात निकालाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

भटक्या कुत्र्यांसंदर्भात निकालाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

पुणे, ता. २२ : भटक्या कुत्र्यांनी सात वर्षाच्या चिमुरड्यावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याने महापालिकेने सोसायटीतील ६० कुत्र्यांना पकडून सुरक्षित निवाऱ्यात ठेवले. मात्र एका प्राणीप्रेमी कार्यकर्त्याने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून भटक्या कुत्र्यांचे संस्थेच्या आवारातच पुनर्वसन करावे, अशी मागणी केली असता न्यायालयाने ती मान्य केली. मात्र संस्थेने या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.
न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी आणि न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठाने सर्व प्रतिवाद्यांना नोटीस बजावून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या कार्यवाहीला स्थगिती दिली आहे. वडगाव शेरीतील एका सहकारी गृहरचना संस्थेच्या आवारात हा प्रकार घडला होता. भटका कुत्रा लहान मुलाला चावल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. या घटनेनंतर महापालिकेने संस्थेच्या आवारातील भटक्या कुत्र्यांवर कारवाई करीत सुरक्षित ठिकाणी नेले. त्यावर एका कार्यकर्त्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ॲनिमल बर्थ कंट्रोल २०२३ च्या नियमानुसार भटक्या कुत्र्यांना त्याच परिसरात सोडले जाणे बंधनकारक आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचे संस्थेच्या आवारातच पुनर्वसन करावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला. मात्र या निकालाविरुद्ध संस्थेने ॲड. सत्या मुळे यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com