व्यापारी दिनानिमित्त गुरुवारी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्यापारी दिनानिमित्त गुरुवारी 
पुरस्कार सोहळ्याचे आयोजन
व्यापारी दिनानिमित्त गुरुवारी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

व्यापारी दिनानिमित्त गुरुवारी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. २२ : पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे व्यापारी दिनानिमित्त स्नेहमेळावा आणि पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी (ता. २५) सकाळी साडेदहा वाजता पद्मावती येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह येथे हा सोहळा पार पडेल. उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्था, व्यापारी, संघटना यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी उपाध्यक्ष बाळासाहेब अमराळे आणि महिला अध्यक्ष शिल्पा भोसले उपस्थित होते.

निवंगुणे म्हणाले, ‘‘या सोहळ्यात ‘उत्कृष्ट व्यापारी’, ‘उत्कृष्ट व्यापारी संघटना’, ‘उत्कृष्ट व्यापार प्रेरणा’ हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. यामध्ये डॉ. अमोल कोल्हे, लिज्जत पापडचे सुरेश कोते, समीर काळे आदींना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.’’ व्यापारी वर्गाला नेहमी सहकार्य करणारे व्यापारी, शून्यातून स्वतःचा व्यवसाय नावारुपाला आणणारे व मालाचा उत्तम दर्जा, ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देणारे, अशांची निवड या पुरस्कारांसाठी करण्यात आली आहे. तर व्यापारी दिनाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील ‘व्यापार क्षेत्रातील दिग्गजांची यशोगाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन या कार्यक्रमाप्रसंगी करण्यात येणार आहे."