लॉजिस्टिक धोरणाविषयी दोन दिवसीय परिषद

लॉजिस्टिक धोरणाविषयी दोन दिवसीय परिषद

पुणे, ता. २२ : देशात राबविण्यात येत असलेल्या ‘राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरण २०२२’ अंतर्गत दोन दिवसीय तांत्रिक परिषदेचे पुण्यात आयोजन केले आहे. ही परिषद परिवहन विभाग महाराष्ट्र राज्य, वर्ल्ड ट्रेड सेंटर (पुणे), ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस, पुणे मेट्रो आदी संघटनांच्या साहाय्याने होणार आहे. ‘साखळी पुरवठा, लॉजिस्टिक आणि वाहतूक’ हा परिषदेचा विषय असल्याची माहिती संयोजक किशोर पिंगळीकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी नितीन आठवले, राजू घाटोळे आणि सुश्मिता नंनदे उपस्थित होते. ही परिषद शुक्रवार (ता. २३) आणि शनिवार (ता. २७) या कालावधीत मराठा चेंबर ऑफ कॉमर्स येथे होणार आहे. परिषदेचे परिषदेचे उद्‍घाटन परिवहन विभागाचे आयुक्त विवेक भीमनवार यांचा हस्ते होणार आहे. अखिल भारतीय मोटार ट्रान्सपोर्टस काँग्रेसचे अध्यक्ष बाल मलकीत सिंग, एमआयटी एडीटीच्या संचालिका डॉ. सुनीता कराड, महाराष्ट्र आर्थिक विकास परिषद (एमईडीसी) मुंबईचे रवींद्र बोराटकर, पुणे मेट्रो उपव्यवस्थापक टी. मनोज कुमार डॅनिअल आदी सहभागी होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com