‘बैठक’ मालिकेतील
रंगले पहिले स्वरपुष्प

‘बैठक’ मालिकेतील रंगले पहिले स्वरपुष्प

पुणे, ता. २२ ः अल्फा इव्हेंटसतर्फे शास्त्रीय संगीतावर आधारित ‌‘बैठक’ या मालिकेतील पहिले स्वरपुष्प ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. अमरेंद्र धनेश्वर आणि जयपूर-अत्रौली घराण्याच्या युवा गायिका डॉ. राधिका जोशी यांनी गुंफले. पहिल्या मैफिलीतील स्वरसुगंधाचा अनुभव रसिकांनी घेतला.
भीमपलास रागातील ‌‘रे बिरहा वमना’ या पारंपरिक बंदिशीने डॉ. जोशी यांनी पहिल्या सत्राची बहारदार सुरुवात केली. ‌‘नाद समुद्र को है’ ही बंदिश सादर करून त्यांनी रसिकांना स्वरानंद दिला. मिश्र खमाजमधील ‌‘सावरियाँ को देखे बिना नाही चैन’ या बंदिशीने त्यांनी सादरीकरणाची सांगता केली. उत्तरार्धात पं. धनेश्वर यांनी ग्वाल्हेर घराण्यातील पारंपरिक ख्याल गायनाने आपल्या प्रस्तुतीला प्रारंभ केला. यमन कल्याण रागातील ‌‘बन रे बलैय्या’ या लग्नसमारंभाचे वर्णन करणाऱ्या बंदिशीने त्यांनी रसिकांना एक अनोखी अनुभूती दिली. ‌यमन कल्याणमधील तराणा त्यांनी प्रभावीपणे सादर केला. ‌‘लालवाला जो बन के सदे रहते’ या भैरवीतील टप्प्याने पंडित धनेश्वर यांनी कार्यक्रमाची सांगता केली. गायकांना प्रज्ञा देसाई यांनी व्हायोलिनवर, लीलाधर चक्रदेव यांनी संवादिनीवर आणि प्रणव गुरव यांनी तबल्यावर समर्पक साथ केली. कलाकारांचा सत्कार ज्येष्ठ गायिका मीना पणशीकर आणि पंडित रघुनंदन पणशीकर यांनी केला. कार्यक्रमाचे निवेदन केतकी गोवंडे यांनी केले. ‌

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com