Tue, October 3, 2023

जयंत पाटील यांच्या
इडी चौकशीविरोधात आंदोलन
जयंत पाटील यांच्या इडी चौकशीविरोधात आंदोलन
Published on : 22 May 2023, 4:35 am
पुणे, ता. २३ : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाने (इडी) केलेल्या चौकशीविरोधात पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केला. यामध्ये इडीसह केंद्रातील मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांना समन्स जारी केल्यानंतर सोमवारी पाटील इडीच्या कार्यालयात गेले आहेत. या वेळी पाटील यांना समर्थन देण्यासाठी बालगंधर्व रंगमंदिर चौकात आंदोलन करण्यात आले. ‘सरकार हमसे डरती है, इडी को आगे करती है’, ‘इडी म्हणजे भाजपचा घरगडी’ अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश काकडे, प्रदीप गायकवाड, किशोर कांबळे, सदानंद शेट्टी, राकेश कामठे, अजिंक्य पालकर, मनोज पाचपुते, नितीन जाधव, महेश हांडे आदी या वेळी उपस्थित होते.