संजय पंडित यांच्या दोन कवितासंग्रहांचे प्रकाशन

संजय पंडित यांच्या दोन कवितासंग्रहांचे प्रकाशन

पुणे ः सनदी लेखापाल संजय पंडित यांनी लिहिलेल्या ‘नक्षत्र दर्शन’ आणि ‘कवडसे मनाचे’ या दोन कवितासंग्रहांचे प्रकाशन ज्येष्ठ कवी व गझलकार रमण रणदिवे आणि संवादिनी वादक डॉ. अरविंद थत्ते यांच्या हस्ते झाले. टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात हा प्रकाशन सोहळा पार पडला. याप्रसंगी ज्येष्ठ तबलावादक तालयोगी पं. सुरेश तळवलकर, ज्येष्ठ गायक पं. विजय कोपरकर, ज्येष्ठ जलतरंगवादक मिलिंद तुळाणकर, तबलागुरू पं. सुरेश सामंत, ऑर्गनवादक राजीव परांजपे, तबलावादक पांडुरंग मुखडे, ज्येष्ठ व्हायोलिनवादक रमाकांत परांजपे, संवादिनीवादक व संगीत-अभ्यासक डॉ. चैतन्य कुंटे, असे संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. श्रीपाद उंब्रेकर यांनी सूत्रसंचालन केले.

बालवाङ्मय पुरस्कार वितरण सोहळा गुरुवारी
पुणे ः अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे यांच्यातर्फे येत्या गुरुवारी (ता. २५) राज्यस्तरीय बालवाङ्मय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले आहे. शुक्रवार पेठ येथील महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या सभागृहात सकाळी १० वाजता आयोजित कार्यक्रमात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. गीताली टिळक यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. यावेळी ज. गं. फगरे, डॉ. न. म. जोशी, विशाल सोनी हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष राजन लाखे यांनी दिली. या कार्यक्रमात सावित्री जगदाळे, संजय गोरडे, समाधान शिकेतोड, सिद्धेश्वर म्हेत्रे, रघुराज मेटकरी, डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी, रमेश कोटस्थाने, शिवाजी चाळक आणि वीरभद्र मिरेवाड या लेखकांना सन्मानित करण्यात येईल.

रास्त भाव धान्य दुकानाचे उद्‍घाटन
पुणे ः कोंढवे-धावडे येथील जय सेवालाल विकास संस्था सरकारमान्य रास्त भाव धान्य दुकानाचे नुकतेच उद्‍घाटन केले. कोंढवे-धावडे गावाचे सरपंच बबन धावडे यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मूर्तीभाऊ राठोड, उत्तमनगर गावाचे सरपंच सुभाष नाणेकर, सरपंच सुरेश गुजर, जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे, कमल राठोड, सुरेश धावजे, दिनकर वांजळे, विलास धावडे आदी उपस्थित होते. उद्‍घाटनानंतर सदस्यांना तांदूळ-गहू किटचे वाटप केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश थोरात यांनी केले. किसन राठोड यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com