
सराफ, वडके, पेटकर यांचा गौरव
पुणे, ता. २३ : कसबा संस्कार केंद्राच्या ३८ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात यंदाचा कसबा कार्य गौरव पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते सारंग सराफ, अष्टपैलू कलाकार वसुधा वडके आणि गायिका समृद्धी पटेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. रविवारी (ता. २८) सायंकाळी पाच वाजता सदाशिव पेठेतील उद्यान प्रसाद कार्यालय सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे, अशी माहिती केंद्राचे प्रमुख संयोजक अनिल दिवाणजी यांनी मंगळवारी (ता. २३) पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला अनघा दिवाणजी, संगीता ठकार, संदीप लचके, सारिका पाटणकर, अपेक्षा राऊत, प्रीती नाईकवडी, पूर्वा ढोले, आर्या परदेशी, दिव्या राऊत, रूपेश कुलकर्णी, चैताली सरमहाले आदी उपस्थित होते. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. योगगुरू डॉ. संप्रसाद विनोद आणि श्री देशमुख महाराज फाउंडेशनचे प्रमुख प. पू. गुरुदास देशमुख महाराज यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान होणार आहेत.