Thur, October 5, 2023

साळवे, कदम यांना
‘रमाईरत्न’ पुरस्कार जाहीर
साळवे, कदम यांना ‘रमाईरत्न’ पुरस्कार जाहीर
Published on : 23 May 2023, 12:33 pm
पुणे, ता. २३ ः महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकतर्फे रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या ८८ व्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी (ता. २७) ‘रमाईरत्न’ पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला आहे. आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते वसंत हरिभाऊ साळवे आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संजीवनी हनुमंतराव कदम यांना ‘रमाईरत्न पुरस्कार प्रदान करणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय स्मारकचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड यांनी दिली. पुरस्कार वितरण सोहळा सायंकाळी सहा वाजता वाडिया महाविद्यालयासमोरील महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे होणार असून पुरस्काराचे वितरण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार आहे.